×
userImage
Hello
 Home
 Dashboard
 Upload News
 My News

 Latest News and Popular Story
 News Terms & Condition
 News Copyright Policy
 Privacy Policy
 Cookies Policy
 Login
 Signup

 Home All Category

Religion / Culture / India / Maharashtra / Nagpur Division
भक्ती

By  Avis Avis
Wed/Jul 21, 2021, 09:49 AM - IST   5    0
Nagpur Division/

नवविधा भक्तीमध्ये मी स्वतः कोणत्या पायरीवर आहे.

श्रवणं कीर्तनं विष्णो :स्मरणं पादसेवनम् । अर्चनं वंदनं दास्यं सख्यं आत्मनिवेदनम। । 

नवविधा भक्तीत श्रवण ही पहिली पायरी आहे ,तर आत्मनिवेदन ही शेवटची .श्रवण भक्तीमार्गाचे प्रवेशद्वार आहे.श्रवण शब्द्दाचा अर्थ ऐकणे आहे असे आपण म्हणतो ,पण श्रवण म्हणजे नुसते ऐकणे नाही तर ऐकलेले जीवनात उतरवणे.कौरव पांडवांची एक गोष्ट आहे .कौरव पांडवांचे गुरु द्रोणाचार्य मुलांना एक धडा दिला नेहमी

खरे बोलावे क्रोध करू नये .दुसा -या दिवशी द्रोणाचार्यनी मुलांना विचारले ,मुलांनो काल काय शिकलात ?

मुलांनी दोन्ही वाक़ये पाठ म्हणून दाखवली .युधिष्ठीराने सांगितले ,'माझी दोन्ही वाक़ये पाठ झाली नाहीत .'१० -१२ दिवसाने युधिष्ठीराने पुन्हा तेच उत्तर दिले तेव्हा द्रोणाचार्य ना काळजी वाटू लागली .त्यांनी भिष्माचा-यांना सांगितले .युधिष्टीर भीष्माचा -यांना म्हणाला .'गेल्या १० -१२ दिवसात मी नेहमी खरे बोललो .त्यामुळे ते वाक्य पाठ झाल्यासारखे आहे .पण क्रोध करू नये हे वाक्य पाठ होत नाही .

कारण काहीतरी कारणांनी राग येतोच.भीष्मांना आनंद झाला ।.आपल्या नातवाला ऐकणे व श्रवण यातला फरक कळला।

समर्थांनी परमार्थाचे मुख्य साधन श्रवण सांगितले आहे .श्रवण अनेक विषयांचे करायला सांगितले आहे -कर्ममार्ग

ज्ञानमार्ग ,सिध्दांतमार्ग ,योगमार्ग ,वैराग्य मार्ग ,नाना व्रते ,नाना तीर्थ ,नाना दाने ,नाना महात्मे ,योग ,मुद्रा ,आसने पिंड ज्ञान सृष्टीज्ञान ,संगीत ,चौदा विद्या ,चौसष्ट कला ,या सर्व गोष्टी श्रवण करायला सांगतात. परमार्थ मार्गाला लागणारा साधक चाळीसी पन्नासी नंतर लागला तर तो हे सर्व वाचू शकणार नाही , मग समर्थांनी हे सर्व वाचायला का सांगितल ? कारण समर्थांच्या पुढे त्यांचे कार्य पुढे नेणारा त्यांचा महंत होता .तो बहुश्रुतच असायला हवा होता त्याला लोकांनी विचारलेल्या कोणत्याही प्रश्नाचे उत्तर देता यायला हवे. सामान्य साधक जेव्हा श्रवण करतो तेव्हा त्याला समर्थ मार्गदर्शन करतात.

ऐसे हे अवघेची ऐकावे । परंतु सार शोधून घ्यावे । असार ते जाणून त्यागावे । या नाव श्रवण भक्ती । । ४ -१ -२९ । । 

सार म्हणजे समर्थांनी सांगितलेली उत्तम लक्षणे,चातुर्य लक्षणे ,सदविद्या लक्षणे ,सत्वगुण लक्षणे ,सार घ्यायचे म्हणजे वर सांगितलेले सद्गुण आपल्यात उतरवण्याचा प्रयत्न करणे ,असार जाणून टाकावे म्हणजे मूर्ख लक्षणे ,पढ़त मूर्ख लक्षणे ,कुविद्या लक्षणे ,तमोगूण लक्षणे या समासातील दुर्गूण काढून टाकणे.

श्रावणात केवळ ऐकणे नसते ,तर ऐकलेल्या गोष्टींचे मनन व्हावे लागते व निदिध्यास ही ।

या नावे जाणावे मनन । अर्थालागी सावधान । निजध्यासे समाधान । होत असे । । ७ -८ -३९ । । 

मनन म्हणजे आपण जे ऐकतो त्याचे चिंतन करणे ,त्याचे अर्थाकडे लक्ष देणे . निदिध्यास म्हणजे एखाद्या गोष्टीची मनाला लागलेली ओढ़ .

By continuing to use this website, you agree to our cookie policy. Learn more Ok